देश

सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर एक महिला आणि पुरुषाने स्वत:ला पेटवून घेतले, आत्महत्येचा प्रयत्न…

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोर स्वत:ला पेटवून घेत दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी गेट क्रमांक डी मधून आत जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यापासून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. त्यानंतर, या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस व्हॅनने तातडीने रुग्णालयात नेले.

सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे या दोघांचेही जीव वाचले आहेत. आग विझवल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पोलिसांच्या गाडीतून राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक ज्वलनशील पदार्थाची बाटलीही सापडली आहे. यातील पदार्थ अंगावर ओतून घेत या दोघांनी स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago