Madhya Pradesh bus accident: The bodies of 42 out of 54 passengers were recovered
मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज (मंगळवार) सकाळी 54 प्रवाशांनी भरलेली बस बाणसागर कालव्यात पडली. आतापर्यंत 42 मृतदेह हाती लागले आहेत. या अपघातातील ६ जण वाचले आहेत. बसचा चालक स्वत: पोहत बाहेर आला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मार्ग बदलून बस अरुंद रस्त्यावरून घेऊन जात होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही मृतदेह वाहून गेल्याचीही शक्यता आहे.
बस सिधी येथून सतनाकडे जात होती. हा अपघात रामपूरच्या नायकिन भागात सकाळी 7.30 च्या सुमारास झाला. अपघातानंतर चार तासांनी सकाळी 11.45 वाजता बसला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या कालव्याची खोली 20 ते 22 फूट आहे. अपघात घडला तेव्हा पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे प्रवाशांना सावरण्याची संधी मिळाली नाही. मृतांमध्ये 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ते सर्वजण रेल्वेची परीक्षा देण्यासाठी सतना येथे जात होते.
५४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कालव्यात कोसळली, 4 प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 32 जण बसू शकत होते, परंतु त्यात 54 प्रवासी भरले होते. बस सिधी येथून छूहियामार्गे सतनाकडे जाणार होती, परंतु येथे रहदारी जास्त असल्यामुळे चालक बसचा मार्ग बदलून कालव्याच्या काठावरुन बस घेऊन जात होता. हा रास्ता अतिशय अरुंद आहे.
राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) ची टीम बचाव कार्य करत आहे. गोताखोर देखील उपस्थित आहेत. कालव्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने बचाव पथकाला पाण्याची पातळी खाली येण्याची प्रतीक्षा करावी लागली. जोरदार प्रवाहामुळे लोक घटनास्थळापासून वाहत दूर गेले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…