A bus carrying 54 passengers crashed into a canal
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात कोसळली. ही घटना सकाळी आठ वाजता घडली आहे. बसमधील 12 हून अधिक प्रवासी स्वत: च पोहत पाण्यातून बाहेर पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सिधीच्या डीएमशी संपर्क साधला. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना बाणसागर धरणातील कालव्याचे पाणी थांबविण्याचे आदेश दिले, जेणेकरून कालव्याचे पाणी कमी होईल आणि बचावकार्य वेगाने करता येईल.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…