देश

मध्य प्रदेश बस दुर्घटना : ५१ मृतदेह सापडले, 5 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला २२ कि.मी. दूर

मध्य प्रदेश येथी सिधी बस अपघाताने अनेक कुटुंबांना खोल जखमा दिल्या. अपघातातील मृतांचा आकडा 51 झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 47 मृतदेह सापडले होते. आज (बुधवार) आणखी 4 मृतदेह सापडले, त्यामध्ये 5 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह देखील सापडला आहे. 3 बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. रामपूर नायकिन गावच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की, रस्ता तयार करा. जर रस्ता जाम झाला नसता, तर आमची कुटुंब अशी उध्वस्त झाली नसती.

बसमध्ये असलेली 5 महिन्यांची शुभी उर्फ ​​सौम्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. तिचा मृतदेह २४ तासांनंतर सिधीपासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या रीवा येथील गोविंदगडजवळ आढळला. तिची आई आणि मावशी यांचा मृतदेह बसमध्येच मंगळवारी सापडला होता.

बसमध्ये एकूण 63 प्रवासी होते. अपघाताच्या काही वेळ अगोदरच यातील तीन प्रवासी बसमधून खाली उतरले होते. 60 पैकी सहा प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ५१ मृतदेह हाती लागले असून ३ जण अजूनही बेपत्ता आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago