IND vs ENG : Another blow to the Indian team after the defeat
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. पण तिसर्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर बंदी होऊ शकते. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
कर्णधार विराट कोहलीने तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता आणि पंचांशी बराच वेळ वाद घालत होता. आयसीसीच्या नियमांनुसार पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवण्यासाठी खेळाडूंवर लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 शुल्क आकारले जाते. या शुल्कामुळे, खेळाडूला 1 ते 4 दरम्यान डिमिरेट गुण दिले जातात. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घातली जाते.
2019 च्या अखेरीस विराट कोहलीला दोन डिमरेट गुण मिळाले आहेत. आता जर चेन्नईत झालेल्या प्रकारामुळे विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमरेट गुण मिळाले तर त्याच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला तिसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…