देश

धक्कादायक! प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुःखी झालेल्या तरुणाने उचलले भयंकर पाऊल…

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुःखी झालेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या तरुणाने या घटनेच्या एक दिवस आधी चाकूने हाताची नस कापतानाचा एक व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतःला जिवंत पेटवून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज विश्वकर्मा नावाच्या तरुणाचे जोगीपुरा येथे राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी सांगितले की, नीरज हा अमली पदार्थांचे व्यसन करायचा, तो व्यवसायाने ऑटोचालक होता. मात्र, त्याच्या व्यसनामुळे त्याचे प्रेयसीबरोबर अनेकदा भांडण व्हायचे. दररोजच्या या भांडणांना कंटाळून आणि प्रियकराच्या ड्रग्जच्या सवयीमुळे नाराज होऊन ही तरुणी नीरजला सोडून तिच्या घरी गेली. मात्र, यामुळे नीरज खूप दुःखी झाला होता.

दरम्यान, शनिवारी सकाळी नीरज आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि घराबाहेरून प्रेयसीला आवाज देऊन आरडाओरडा करू लागला. मात्र, बराच वेळ कोणी बाहेर न आल्याने नीरजने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही घटना घडली त्यावेळी नीरजची प्रेयसी घरी नव्हती आणि ती स्वतः नीरजला भेटायला त्याच्या घरी गेलेली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांची भेट झाली नाही. दरम्यान, प्रेयसीला फोनवर माहिती मिळाली की नीरजने तिच्या घराबाहेर स्वत:ला पेटवून घेतले आहे, त्यानंतर तिने तत्काळ तिचे घर गाठले आणि तेथून गंभीर भाजलेल्या नीरजला घेऊन ती रुग्णालयात पोहोचली, मात्र नीरजचा जीव वाचू शकला नाही आणि त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago