देश

काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आपले दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कॉन्स्टेबल संतोष यादव (1RR बटालियन) हे चकमकीत गोळी लागल्याने शहीद झाले. दुसरीकडे याच कारवाईत गोळी लागल्याने शिपाई चव्हाण रोनित तानाजी (1RR बटालियन) हे देखील शहीद झाले आहेत. शहीद झालेले दोन्ही जवान 1 RR (राष्ट्रीय रायफल) चे आहेत.

चकमकीदरम्यान गोळी झाडली
अधिका-यांनी सांगितले की, शोपियानच्या जैनापुरा भागातील चेरमर्ग येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. ते म्हणाले की, जेव्हा सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत होते तेव्हा तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले, त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) चे होते. 29 जानेवारी रोजी अनंतनागमध्ये हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांच्या हत्येमध्ये एका दहशतवाद्याचा हात होता.

विशेष म्हणजे दक्षिण काश्मीर हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. अनेकदा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकीच्या घटना समोर येत असतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago