देश

मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईची किंमत माहितेय? जाणून घ्या काही आश्चर्यजनक गोष्टी…

निवडणुकीची शाई : मतदान केल्यानंतर बोटांवर लावली जाणारी शाई किती काळ टिकते? ती कुठे तयार होते? आणि निवडणुकीच्या शाईचा प्रवास कुठून सुरू झाला? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. आज आपण या शाईविषयी जाणून घेऊयात…

सुरुवातीला फक्त संसदीय आणि विधानसभा निवडणुकांसाठी शाई पुरवली जायची पण नंतरच्या काळात महापालिका आणि सहकारी संस्थांनाही निवडणुकांसाठी शाई पुरवण्याच्या येऊ लागली. MPVL नुसार ही उच्च दर्जाची शाई 40 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्णपणे सुकते. मात्र, त्वचेवर एक सेकंदही शाई राहिली तर त्याचा परिणाम होतो. ही शाई 1962 च्या निवडणुकांपासून वापरली जात आहे. भारतीय निवडणुकांमध्ये ही शाई लावण्याचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते. अजूनपर्यंत निवडणूक आयोगाला यासाठी दुसरा पर्याय शोधता आलेला नाही. गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ या शाईचा वापर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

देशात निवडणुकीची शाई कुठे तयार केली जाते?
निवडणुकीच्या शाईद्वारे हे सुनिश्चित केले जाते की कोणत्याही मतदाराने निवडणुकीत दोनदा मतदान केले नाही आणि त्यामुळे ही शाई फसवणूक आणि एकाधिक मतदान टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ही शाई भारतात फक्त एकाच कंपनीत बनवली जाते. ही शाई सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (MPVL) यातून बनवली जाते. या कंपनीची स्थापना 1937 साली झाली. याची सुरुवात म्हैसूर प्रांतातील महाराज न लवाडी कृष्णराज वाडियार यांनी केली होती. निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालय, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NRDC) यांच्या सहकार्याने निवडणुकीसाठी ही शाई पुरवण्यासाठी कंपनीसोबत करार केला तेव्हा MVPL प्रगतीच्या मार्गावर सरसावले.

एका ड्रॉपची किंमत किती आहे?
किंमतीबद्दल सांगायचे तर प्रत्येक बाटलीमध्ये 10 मिली शाई असते आणि प्रत्येक बाटलीची किंमत सुमारे 127 रुपये आहे. एका लिटरची किंमत 12 हजार 700 रुपयांच्या जवळपास आहे, तर ड्रॉपच्या आधारे त्याची किंमत सुमारे 12 रुपये 70 पैसे आहे.

निवडणुकीची शाई बोटाने का पुसत नाही?
वास्तविक ही शाई बनवण्यासाठी सिल्व्हर नायट्रेट रसायनाचा वापर केला जातो. या कारणास्तव, त्वचेच्या कोणत्याही भागावर एकदा लावल्यानंतर, ती कमीतकमी 72 तासांपर्यंत त्वचेवरून काढली जाऊ शकत नाही. सिल्व्हर नायट्रेट रसायन वापरले जाते आणि जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा ते काळे होते आणि बराच काळ टिकते. तुम्ही मतदानाला जाता तेव्हा ते तुमच्या बोटावर लावले जाते. सिल्व्हर नायट्रेट आपल्या शरीरात असलेल्या मीठासोबत एकत्र होऊन सिल्व्हर क्लोराईड तयार होते. सिल्व्हर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही आणि त्वचेला चिकटते. ते साबणाने धुता येत नाही. एकदा लावल्यानंतर हे तेव्हाच निघते जेव्हा त्वचेच्या पेशी जुन्या होऊन बाहेर पडू लागतात.

कोणत्या बोटाला शाई लावतात आणि ते बोट नसेल तर?
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या डाव्या हातावर म्हणजेच डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. ब्रशच्या सहाय्याने नखाच्या वरपासून पहिल्या गाठीपर्यंत अमिट शाई लावली जाते. एखाद्याच्या डाव्या हाताला तर्जनी नसेल तर? अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटावर शाई लावता येते. डाव्या हाताला बोट नसेल तर ही शाई उजव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाते. त्याच्या उजव्या हातात तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावता येते. जर त्याच्या दोन्ही हातात बोटे नसतील तर दोन्ही हातांच्या कोणत्याही भागावर शाई वापरता येते. दोन्ही हात नसल्यास पायाच्या बोटावर शाई लावली जाते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

13 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago