jammu weaponised drones for terrorist india united nations concern
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सैन्यतळावर ड्रोन हल्ला करण्याच्या कट रचल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सभेत उपस्थित करण्यात आला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की रणनीतिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध दहशतवादी कारवायांसाठी सशस्त्र ड्रोन वापरण्याच्या शक्यतेकडे जागतिक समुदायाचे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे.
गृह मंत्रालयाचे विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस.के. कौमुदी म्हणाले की आज दहशतवादाचा प्रचार आणि संवर्ग भरतीसाठी इंटरनेट व सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे, दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन पेमेंट पध्दती आणि क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म वापरले जात आहेत आणि दहशतवादी आता ड्रोन तंत्रज्ञान देखील वापरत आहेत. कमी किमतीमध्ये हा पर्याय उपलब्ध असल्याने आणि सहज उपलब्ध असल्याने दहशतवादी ड्रोनचा वापर करीत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी शस्त्रे किंवा स्फोटके एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहज पाठविली जात आहेत, हा जगभरातील सुरक्षा एजन्सीसाठी धोका असून मोठे आव्हान बनले आहे.
कौमुदी पुढे म्हणाले की, रणनीतिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध सशस्त्र ड्रोनच्या वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे, आम्ही दहशतवाद्यांना सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर करताना पाहिले आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीचा अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नाही, पण एअरबेस ड्रोनवरील हल्ल्याबाबत आणि सीमाभागात ड्रोन दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत राजनाथ सिंह सैन्याच्या तयारीविषयी सांगू शकतात.
जम्मूमध्ये सतत ड्रोन दिसत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. याची सुरुवात 26-27 जून दरम्यान मध्यरात्रीपासून झाली, जेव्हा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. सध्या जम्मू ड्रोन हल्ल्याचा तपास सुरू आहे, २४ तासात पुन्हा दोन ड्रोन्स दिसले. या ड्रोन्सचे टार्गेट जम्मूमधीलच कालूचक सैन्य तळ होते. रविवारी रात्री 11:45 वाजता पहिला ड्रोन दिसला. त्यानंतर सुमारे तीन तासांनंतर दुपारी 2:40 वाजता दुसरा ड्रोन दिसला. एअरफोर्स स्टेशनवर एक दिवस अगोदर हल्ला झाला होता, त्यामुळे ड्रोन पाहिल्यावर हाय अलर्ट जारी करून त्वरित प्रतिक्रिया दल सक्रिय करण्यात आले.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…