देश

आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं होणार खूप अवघड, जाणून घ्या…

नवी दिल्ली : रस्त्यावरुन जाताना आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून, सरकारकडून आता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. नवीन नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी अर्जदारास व्हिडिओ ट्यूटोरियल दाखविला जाईल. ड्रायव्हिंग चाचणीच्या एक महिन्यापूर्वी दाखविलेल्या या व्हिडिओ ट्यूटोरियलमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त, अपघातग्रस्तांच्या कुटूंबाबरोबर चर्चा देखील करावी लागेल, जेणेकरून रस्त्यावरुन जाताना आपल्या आणि इतरांच्या जीवनाचे किती महत्त्व असते, याची जाणीव होऊ शकेल.

नवीन नियम नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. नियमांनुसार, तुमच्याकडे जर आधीपासूनच ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला सुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सेफ्टी सर्टिफिकिट कोर्स) पास करावा लागेल. हा रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 महिने मिळतील. हा कोर्स पूर्ण केलेल्या ड्रायव्हरचे आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक केले जाईल, जेणेकरुन त्यांच्या ड्रायव्हिंगला ट्रॅक करता येऊ शकेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) आता सुरक्षित वाहन चालविण्याबाबत कडक नियम लागू करणार आहे. दुचाकी वाहन हेल्मेटशिवाय चालवणारे आणि पोलिसांना भेटून टोल क्रॉस करणाऱ्यांना चिन्हांकित करण्यासाठी मंत्रालय एक यंत्रणा सुरू करणार आहे. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे फूटेज शेअर केले जाणार असून त्यांचे चालान कापले जाईल.

रस्ते सुरक्षेबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी केंद्र सरकार हे नियम आणत आहे. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये सुमारे 44,666 दुचाकी चालकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यातील 80 टक्के वाहनचालकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. अहवालानुसार, नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना ऑनलाईन व्हिडिओ ट्यूटोरियल आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळविलेल्यांसाठी सेफ्टी सर्टिफिकिट कोर्स येत्या काही दिवसांत नवीन सेंट्रल मोटर वाहन नियमात समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago