देश

IRCTC ने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या…

IRCTC New Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी असलेल्या IRCTC ने तिकिटांच्या बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, IRCTC ऍप आणि वेबसाइटद्वारे, तुम्हाला प्रथम तुमचे खाते व्हेरिफाय करावे लागेल, त्यानंतर तिकीट बुकिंग केले जाईल. तसेच, आता एका युजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त तिकीट बुक करण्याची मर्यादा 12 वरून 24 करण्यात आली आहे. जे खूप प्रवास करतात त्यांच्यासाठी हे चांगले पाऊल आहे.

पडताळणी अनिवार्य आहे
IRCTC च्या नवीन नियमांनुसार, आता तिकीट बुक करण्यापूर्वी वापरकर्त्यांना मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी करणे आवश्यक असेल. ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरची पडताळणी केल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकणार नाही.

IRCTC खात्याचे देशभरात लाखो वापरकर्ते आहेत, त्यापैकी हजारो लोकांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ऑनलाइन तिकिटे बुक केलेली नाहीत. हा नियम फक्त अशा लोकांना लागू आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून तिकीट बुक केले नसेल तर आधी व्हेरिफिकेशन करणे आवश्यक झाले आहे.

असे करा व्हेरिफिकेशन :

  • IRCTC ऍप किंवा वेबसाइटवर जा आणि व्हेरिफाय विंडोवर क्लिक करा.
  • येथे तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका, त्यानंतर Verify वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो एंटर करा आणि मोबाईल नंबर सत्यापित करा.
  • याप्रमाणेच ई-मेल आयडीवर आलेला कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडी व्हेरिफाय करा.
  • आता तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

1 महिन्यात 24 तिकिटे काढता येणार
रेल्वेने IRCTC च्या एका यूजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त तिकीट बुक करण्याची मर्यादा १२ वरून २४ पर्यंत वाढवली आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक यूजर आयडी असेल तर आता तुम्ही एका महिन्यात २४ तिकिटे बुक करू शकता. त्याचप्रमाणे आधार UID लिंक नसलेल्या खात्यातून 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करता येतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago