देश

पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील ४०४ सेवेकरी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बाराव्या शतकातील पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील ३५१ सेवेकरी व ५३ कर्मचारी यांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी दिली. ते म्हणाले की, जगन्नाथ मंदिरातील पूजाअर्चा चालू असून सध्या कुणीही सेवेकरी उपस्थित नाहीत. जगन्नाथ मंदिर मार्चपासून करोनामुळे बंद ठेवण्यात आले होते.

करोना झालेले सर्व जण घरी विलगीकरणात असून पूजाविधीची माहिती असलेले फार कमी लोक असल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. बलभद्र, देवी सुभद्रा, जगन्नाथ यांच्या पुजेसाठी किमान १३ पुजारी लागतात. त्यामुळे सेवेकरी व पुजारी मिळून रोज ३९ जणांची गरज असते. जगन्नाथाच्या रुपात येथे विष्णूची पूजा केली जाते.

पुरीच्या मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत पूजा विधी चालू असतात. एक पूजाविधी केला नाही तर दुसरा करता येत नाही असे जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले. आणखी सेवेकरी व पुजारी करोनाग्रस्त झाले तर अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे प्रशासन कनिष्ठ पुजारी व सेवेकऱ्यांची व्यवस्था करण्याच्या विचारात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago