Indian Student Killed At Subway Station In Canada’s Toronto
नवी दिल्ली : कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या अनेक जखमा झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या तरुणाचे नाव कार्तिक वासुदेव असून टोरंटोमधील सबवे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारामुळे अनेक जखमा झालेल्या वासुदेवला ऑफ-ड्युटी पॅरामेडिककडून वैद्यकीय मदत मिळाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. टोरंटो पोलिसांनी सांगितले की तपासकर्ते त्यावेळी परिसरात असलेले साक्षीदार तसेच कॅमेरा फुटेजसह अन्य काही पुराव्यांचा शोध घेत आहेत.
टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गुरुवारी टोरंटोमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव याच्या दुर्दैवी हत्येमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि व्यथित आहोत”. “आम्ही कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि मृत व्यक्तीचे अवशेष लवकर परत आणण्यासाठी शक्य ती सर्व मदत करू,” असे टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…