महाराष्ट्र

मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जमावाला भडकवणे, कलम १४१, १४९, १२० ब (कट रचणे), अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे कलम ३५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणंही मिळाली आहे. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे.

थोड्याच वेळात गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

माझी हत्या होऊ शकते, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago