देश

कार विकल्यानंतर FASTag चे काय करायचे? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे…

पुणे : जर तुम्ही तुमची कार विकणार असाल, किंवा विकण्याचा विचार करत असाल, तर त्यामुळे त्यावर इन्स्टॉल केलेल्या FASTag चे काय होईल? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम टॅग देणाऱ्या बँकेला कळवावे लागेल. ते FASTag खाते बंद करावे लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानेही आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही गाडी विकली तर फास्टॅगने काय होईल? पण तसे नाही, FASTag डिऍक्टिव्हेट न केल्यास खूप नुकसान होऊ शकते.

जर तुम्ही तुमची कार विकली असेल तर FASTag लवकर बंद करायला हवे. तसे न केल्यास तुमच्या त्याच खात्यातून टोल भुगतान होत राहील. म्हणजेच गाडी दुसऱ्याची होईल पण पैसे तुमच्या खात्यातून जातील. दुसरीकडे, जर FASTag खाते लिंक असेल, तर नवीन कार मालक देखील नवीन FASTag साठी अर्ज करू शकत नाही. वाहनावर फक्त एकच फास्टॅग लिंक असते.

फास्टॅग खाते कसे बंद करावे?

FASTag लिंक केलेली खाती किंवा ई-वॉलेट बंद करण्यासाठी सेवा प्रदात्यांच्या (Service providers) प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. परंतु सर्वात सोपा मार्ग म्हणजे FASTag प्रदात्याच्या ग्राहक सेवाशी (customer care) संपर्क साधणे. तुम्ही खाली दिलेल्या काही स्टेप्स देखील फॉलो करू शकता.

  1. FASTag खाते बंद करण्यासाठी कस्टमर केयर सेवेला कॉल करा.
  2. FASTag शी संबंधित उपायांसाठी, तुम्ही हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करू शकता.
  3. FASTag शी लिंक केलेले मोबाईल अॅप वापरा.
  4. FASTag जारी करणार्‍या अॅप किंवा प्रीपेड वॉलेटमध्ये लॉग इन करा.
  5. आता FASTag खाते बंद करण्याच्या स्टेप्स फॉलो करा.
  6. तुम्ही FASTag जारी करणार्‍या बँकेच्या पोर्टलवर जाऊन देखील FASTANG बंद करू शकता.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago