देश

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी आढळला मृतावस्थेत

हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद जिल्ह्यातील सैदाबाद येथे 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपी रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत आढळला आहे. गुरुवारी हैदराबाद पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला. हा मृतदेह या प्रकरणातील आरोपींचा असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हा मृतदेह टॅटूवरून ओळखला असून चाचणीचे निकाल येणे बाकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारनगलमधील रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. त्यानंतर त्यांना या मृतदेहाच्या हातावर बनवलेल्या टॅटूच्या आधारे हा मृतदेह सैदाबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीचा असल्याचे आढळले. पोलिसांनी सांगितले की हा तोच आरोपी असल्याचे दिसत आहे, परंतु चाचणीचे निकाल आल्यानंतरच या गोष्टीची पुष्टी होऊ शकते.

9 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे एका ६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीवर पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी आरोपीवर दहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तर तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी आदल्या दिवशी एक निवेदन दिले होते की, या प्रकरणातील आरोपीला पकडू आणि नंतर त्याचा एन्काउंटर करू.

6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago