देश

6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…

हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू.

तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद प्रकरणाबाबत लवकरात लवकर न्याय मिळवण्याविषयी सांगितले. मल्ला रेड्डी यावेळी म्हणाले की, हैदराबादच्या मुलीची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आम्ही त्याला अटक करू आणि मग एन्काउंटर करू. त्यांनी आश्वासन दिले की लवकरच ते पीडित कुटुंबाला भेटतील, त्यांना सर्वप्रकारे मदत करतील. त्यानंतर एन्काउंटरबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही आरोपींना सोडणार नाही.

हैदराबादमध्ये 9 सप्टेंबर रोजी 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. मुलीचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. पोलीस या प्रकरणात 30 वर्षीय आरोपीचा शोध घेत आहेत, जो शेजारीच राहत होता. पोलिसांनी 15 टीम तयार केल्या आहेत, जे या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथेही आरोपींचा शोध सुरू आहे. हैदराबाद पोलिसांनी आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे, जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर पकडता येईल. या प्रकरणामुळे तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडाली असून पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबाव आहे. हैदराबादसह तेलंगणाच्या विविध भागात आता निदर्शने तीव्र होत आहेत. लोकांनी कॅन्डल लाईट मार्च काढून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago