देश

भयंकर! जन्मदात्या पित्याने घेतला दोन वर्षांच्या मुलाचा जीव, पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्यामुळे…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एका पित्याने आपल्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. पत्नीने पतीला दारू पिण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. जन्मदात्या पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. त्यानंतर आरोपी पिता फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील आदमपूर येथील रहिवासी प्रेमचंद उर्फ ​​रवी याचा चार वर्षांपूर्वी खुशबू नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. त्यांचा दोन वर्षांचा लवकुश नावाचा मुलगा होता. प्रेमचंदला दारू पिण्याचे व्यसन होते. तो अनेकदा दारू पिऊन घरी आल्यावर खुशबूला मारहाण करायचा. शुक्रवारी खुशबूने त्याला दारू पिण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान, प्रेमचंद याने दोन वर्षांचा मुलगा लवकुश याला जमिनीवर फेकले, ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी प्रेमचंद फरार आहे.

खुशबूने सांगितले की, तिच्या दोन वर्षांच्या मुलाला तिच्या पतीने जमिनीवर फेकून मारले. कोणतेही वाद नव्हते. फक्त दारू पिण्यास नकार दिल्यामुळे वाद झाला होता. मुलगा तिच्या मांडीवर होता. मात्र रागाच्या भरात प्रेमचंद्रने मुलाला हिसकावून घेतले आणि त्याला विटांच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. त्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 महिने ago