देश

व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, अनेकींचे नग्न व्हिडिओ… अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मल्याळी चित्रपटांच्या चित्रीकरण सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लावून अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी शनिवारी केला. तसेच, पुरुष कलाकार असे व्हिडीओ त्यांच्या मोबाइलवर पाहत असताना आपण स्वत: पाहिले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मल्याळी चित्रपटसृष्टीत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाशी संबंधित न्या. के. हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर केरळसह देशभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राधिका यांनी हा धक्कादायक दावा केला. हेमा समितीच्या अहवालाला झालेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित करतानाच, केवळ मल्याळी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर अन्य ठिकाणीही महिलांचा छळ व त्यांच्याशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप राधिका यांनी केला.

व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलतानाचे महिलांचे व्हिडीओ मी स्वत: पाहिले आहेत. मला खूप राग आला. मला सुरक्षितता हवी असल्याचे सांगत मी व्हॅनिटी व्हॅन नाकारून माझ्या हॉटेलच्या रूममध्ये परत गेले. तसेच, गाडीमध्ये पुन्हा छुपे कॅमेरे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा मी संबंधित व्यक्तीला दिला होता, असे त्या म्हणाल्या. अर्थात, कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली व ते आक्षेपार्ह व्हिडीओ कोण पाहत होते, याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. हेमा समितीच्या अहवालावर चित्रपटसृष्टीतील पुरुष कलाकारांनी मौन बाळगल्याबद्दल ६२ वर्षीय राधिका यांनी टीका करतानाच, आता महिला कलाकारांना स्वतःला आपल्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

मी मल्याळी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही दबावगटाचा भाग नाही किंवा असा कोणताही गट अस्तित्वात असल्याची मला कल्पना नाही, असे स्पष्टीकरण मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांनी शनिवारी दिले. हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ (अम्मा) या केरळमधील प्रभावशाली चित्रपट कलाकार संघटनेचे माजी अध्यक्ष मोहनलाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘गैरकृत्य करणाऱ्यांविरुद्ध पुरावे असल्यास त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, असे त्यांनी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांवरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या संदर्भाने नमूद केले.

अभिनेते व आमदार एम. मुकेश यांच्याविरोधात केवळ बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे विधान सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शनिवारी केले. पक्षाच्या राज्य समितीच्या बैठकीनंतर राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन पत्रकार परिषदेत बोलत होते. मुकेश यांच्यावरील आरोप लक्षात घेता, ते चित्रपट निर्मिती धोरण समितीचा भाग नसतील, असा निर्णयही पक्षाने घेतला असल्याचे ते म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago