देश

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी चांगली बातमी, जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी सर्वात मोठी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले कि, जानेवारी 2021 मध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 लाख कोटी रुपयांचे जीएसटी (GST) संकलन झाले आहे. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलनाच्या तुलनेत 8% अधिक महसूल मिळाला आहे.

पीआयबीच्या मते, जानेवारी 2021 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 119847 कोटी आहे, त्यापैकी सीजीएसटी 21923 कोटी, एसजीएसटी 29014 कोटी, आयजीएसटी 60288 कोटी आणि उपकर म्हणजेच Cess 8622 कोटी आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी संकलनात सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, हे अर्थव्यवस्थेच्या जलद रिकव्हरीचे लक्षण आहे. गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची ही आकडेवारी सर्वात मोठी आहे. निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सध्या जीएसटी संकलनाची ही आकडेवारी सरकारला दिलासा देणारी आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago