देश

घर किंवा गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर, ‘या’ बँकांनी व्याजदर केले कमी

एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेने व्याज दर कमी केले आहेत. कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेने त्यांचे मार्जिनल कोस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर एमसीएलआर (MCLR) कमी केले आहेत. या कपातीनंतर या बँकांची कर्जे स्वस्त होणार आहेत. एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी कपात केली आहे. सोमवारी बँकेने याबाबत माहिती दिली.

ओव्हरनाईट आणि एका महिन्यासाठी एमसीएलआर आता 6.7 टक्के झाला असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. याशिवाय तीन महिन्यांसाठी एमसीएलआर 6.95 टक्के, सहा महिन्यांसाठी MCLR 7.30 टक्के आणि MCLR 7.35 टक्के एक वर्षासाठी आहेत. तथापि, रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (RLLR) 6.79 टक्क्यांवर कायम आहे.

HDFC बँक :

एचडीएफसी बँकेचा ओव्हरनाईट MCLR 6.85 टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी 6.9 टक्के. तर, तीन महिन्यांसाठी बँकेचे MCLR 6.95 टक्के आहे. 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.05 टक्के. हा दर बँकेत 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7.2 टक्के आहे. 2 वर्षांच्या कालावधीसाठी एमसीएलआर 7.3 टक्के आहे. तर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.4 टक्के आहे.

MCLR म्हणजे काय?

बँका MCLR वाढवतात किंवा कमी करतात, ही नवीन कर्जदारांसाठी सुविधा आहे. तसेच एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होतो. एप्रिल 2016 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कर्जासाठी निश्चित केलेला किमान दर बेस रेट असायचा. म्हणजे बँका यापेक्षा कमी दराने ग्राहकांना कर्ज देऊ शकत नव्हत्या. 1 एप्रिल 2016 पासून बँकिंग प्रणालीमध्ये MCLR लागू करण्यात आला आणि तोच कर्जासाठी सर्वात कमी दर ठरला. त्यानंतर केवळ MCLR च्या आधारे कर्ज देणे सुरू झाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago