देश

मोठी बातमी! भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला जर्मनीची मान्यता, भारतीयांसाठी का आहे आवश्यक? जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सीनला जर्मनीने मान्यता दिली आहे. ही लस भारतात तयार झाली आहे. या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यानंतर आता जर्मनीला जाणाऱ्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवाशांना 1 जूनपासून लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोवॅक्सीनला ही मान्यता प्रवासासाठी देण्यात आली आहे.

लोकांना मोठा दिलासा
ज्या लसीला कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाही, ती घेतलेल्या प्रवाशांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. ज्यामध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्र, कोरोना चाचणी, क्वारंटाईन यासारख्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. कोवॅक्सीन घेणार्‍या लोकांनाही जर्मनीमध्ये अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता, परंतु आता मंजुरी मिळाल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेत क्लिनिकल चाचण्यांवरील बंदी उठवली
याआधी, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने भारत बायोटेकच्या कोविड-19 लसीच्या ‘कोव्हॅक्सीन’च्या तीन क्लिनिकल चाचण्यांपैकी फेज II वरील बंदी उठवली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये या लसीसाठी भारत बायोटेकचे भागीदार ओकुजेन इंक यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही कोवॅक्सीनसाठी आमची क्लिनिकल चाचणी पुढे चालू ठेवू शकतो, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की अतिरिक्त, भिन्न प्रकारची लस पुरवण्याची गरज प्राधान्याने राहिली आहे.

एप्रिलमध्ये चाचणी थांबवण्याचा एफडीएचा निर्णय यूएस कंपनीच्या चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्यांना लसीच्या डोसचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याच्या स्वेच्छेने अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावर आधारित होता. भारतातील लसीच्या उत्पादन युनिटवर जागतिक आरोग्य संघटनेच्या टिप्पण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago