मनोरंजन

अभिनेत्री बिदिशाची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती…

मुंबई : २१ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार ने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. बुधवारी बिदिशाचा मृतदेह पोलिसांना गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. या वृत्तामुळे बंगाली सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नगर बाजार येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना त्या घरातून बिदिशाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. घराचं दार आतून बंद होतं, ज्यामुळे दार तोडून पोलिसांनी आत जावं लागलं. नंतर बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांना बिदिशाच्या घरातून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

बिदिशाच्या मित्र-मैत्रिणींचे म्हणणे आहे की, ती तिच्या बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने पोलिसांना सांगितले की, ती डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाचा प्रियकर अनुभवच्या आणखीन तीन प्रेयसी होत्या आणि त्यामुळे बिदिशा डिप्रेशनमध्ये होती. विशेष म्हणजे, अभिनेत्रीने आपल्या सुसाइड नोटमध्ये ती कर्करोगग्रस्त असल्याचंही लिहिलं आहे, पण तिला कोणताही कर्करोग नव्हता. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago