देश

१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया.

SBI ने नियम बदलले
1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि चेकबुक वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे सर्व नवीन नियम बेसिक बचत खाते डिपॉझिट (BSBD) खात्यावर लागू होतील. एसबीआय एटीएम किंवा बँक शाखेतून 4 वेळा पैसे काढणे विनामूल्य असेल. या मर्यादेनंतर रोख पैसे काढताना 15 रुपये आणि जीएसटी द्यावे लागतील. याशिवाय आता चेकबुक घेण्याकरिता तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल.

IDBI बँकेतून पैसे काढणे महाग होईल
१ जुलैपासून आयडीबीआय बँक चेक लीफ शुल्क, बचत खाते शुल्क आणि लॉकर शुल्क बदलणार आहे. बँकेने अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांमध्ये सध्याची 7 आणि 10 ची मर्यादा कमी करून 5 – 5 वेळा रोख ठेव (फ्री आणि होम-नॉन-होम) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

याशिवाय आता ग्राहकांना दरवर्षी केवळ 20 पृष्ठांचे चेकबुक विनामूल्य मिळणार आहे. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ग्राहकांना ५ रुपये द्यावे लागतील. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना लॉकरवर मिळणारी सूट तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांची मासिक सरासरी शिल्लक (MAB) 10 हजार असेल.

सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन IFSC कोड वापरावा लागेल
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचे आयएफएससी कोड बदलत आहेत. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या बँक शाखेसाठी नवीन IFSC कोड घ्यावा लागेल.

प्रत्येक दागिन्यांची विशिष्ट ओळख अनिवार्य असेल
दागिने चोरीला गेले आहेत किंवा हरवले आणि जर ते वितळवले गेले नाहीत, तर त्याचा वास्तविक मालक सहजपणे शोधता येईल. वास्तविक, ज्याप्रमाणे देशातील सर्व नागरिकांची ओळख यूआयडीद्वारे आधार कार्डमध्ये करण्यात आली आहे, त्याच प्रकारे, 1 जुलैपासून, सरकार दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यांची युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडी) अनिवार्य करणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलू शकतात
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची घोषणा करते. मागील महिन्यात सरकारने 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 122 रुपयांची कपात केली होती.

छोट्या बचत योजनेच्या व्याजदरात कपात होऊ शकते
छोट्या बचती म्हणजेच लहान बचत योजनेत गुंतवणूक करणा्यांना धक्का बसू शकेल. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी सरकारने मार्चमध्ये त्यांचे व्याज दर कमी केले होते. पण नंतर ही कपात मागे घेण्यात आली. पीपीएफ, सुकन्या समृद्धि योजना, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, मासिक उत्पन्न योजना, वेळ ठेव आणि आवर्ती ठेव योजना या लहान बचत योजनेत येतात.

मारुती आणि हिरोच्या वाहनांच्या किंमती वाढतील
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या कार आणि हीरोच्या बाईक 1 जुलैपासून महाग होतील. हीरो स्कूटर आणि मोटारसायकल्सच्या एक्स शोरूम किंमतीत 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करीत आहे. तसेच मारुती त्यांच्या बर्‍याच सेगमेंटच्या कारच्या किंमतींमध्येही वाढ करणार आहे.

50 लाखांच्या वर खरेदीवर टीडीएस वजा केला जाईल
नवीन कलमांतर्गत 50 लाख रुपयांहून अधिक व्यापार खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस वजा केला जाईल. 1 जुलैपासून 206 एबी विभागदेखील प्रभावित होईल. त्याअंतर्गत, विक्रेत्याने जर दोन वर्षांपर्यंत आयकर विवरणपत्र भरले नाही, तर हा टीडीएस 5% होईल. म्हणजेच जो टीडीएस आधी ०.१० होता, तो पाच टक्के म्हणजे 50 पटीने वाढेल.

लर्निंग लायसन्स बनविण्यासाठी ऑनलाईन अर्ज
आता तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच घरातूनच टेस्ट देता येईल. टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स तुम्हाला घरपोच मिळेल. तथापि, स्थायी परवान्यासाठी प्रत्यक्ष ट्रॅकवर वाहन चालवून दाखवावे लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago