देश

देशात प्रथमच धावणार विनाचालक मेट्रो, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

दिल्ली मेट्रोने सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता 28 डिसेंबरपासून देशात प्रथमच दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनवर विनाचालक मेट्रो धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मॅजेन्टा लाइन हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडोर असेल, ज्यावरून या तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो ऑपरेट केली जाईल. डीएमआरसी (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षातून मेट्रोला नियंत्रित केले जाईल. मॅजेन्टा लाइननंतर पिंक लाईनवर देखील ड्रायव्हरलेस मेट्रो ऑपरेट केली जाणार आहे.

फेज तीनच्या या तीनही कॉरिडोरवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नल यंत्रणा वापरली गेली आहे. या मदतीने या दोन्ही कॉरिडॉरवर ड्रायव्हरलेस मेट्रो चालविली जाऊ शकते. सध्या या दोन्ही कॉरिडॉरच्या मेट्रोमध्ये चालक उपस्थित आहेत. डीएमआरसीने काही महिन्यांपूर्वी ड्राईव्हरलेस मेट्रो चालविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली होती. ज्याने दोन्ही कॉरिडॉरच्या मेट्रो ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, नियंत्रण कक्ष इत्यादींची पाहणी केली. त्यानंतर मॅजेन्टा लाइन कॉरिडॉरवर काही तांत्रिक बदल करण्यात आले.

अलीकडेच केंद्र सरकारने ड्रायव्हरलेस मेट्रोच्या कामकाजास मान्यता दिली होती. यानंतर बोटॅनिकल गार्डन ते जनकपुरी पश्चिम दरम्यान 37 किमी लांबीच्या मॅजेन्टा लाइनवर ड्रायव्हरलेस मेट्रो चालविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी मेट्रोने आपली 18 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 डिसेंबरपासून ड्रायव्हरलेस मेट्रोचे काम सुरू होताच डीएमआरसीचे हे यावर्षीचे  सर्वात मोठे यश असेल. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतात विनाचालक मेट्रो धावेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago