देश

हृदयद्रावक! भटक्या कुत्र्याने नवजात बाळाचे लचके तोडले, खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार…

हरियाणा : पानिपत शहरातील एका खासगी रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रात्री उशिरा एका भटक्या कुत्र्याने नवजात बाळाला रुग्णालयातून नेले. दोन दिवसांपूर्वी या बाळाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री कुटुंबातील सदस्य बाळासोबत हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये झोपले असताना एका भटक्या कुत्र्याने बाळाला उचलून नेले.

काही वेळाने जाग आल्यावर बाळ जवळ न दिसल्याने त्यांनी बाळाचा शोध सुरू केला. बाळाचा शोध घेत असताना कुटुंबीय रुग्णालयाबाहेर पोहोचले असता त्यांना एका कुत्र्याने नवजात बाळाला तोंडात धरले असल्याचे दिसले. कुटुंबीयांनी अथक प्रयत्न करून कशीतरी कुत्र्यापासून बाळाची सुटका केली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. बाळाचा मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 13-17 पोलीस स्टेशन हद्दीतील अन्सल सुशांत सिटी गेट नंबर 3 जवळ आर्ट अँड मदर केअर हॉस्पिटल आहे, जिथे आस मोहम्मदची पत्नी शबनम हिला 25 जून रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री 8.15 वाजता महिलेने मुलाला जन्म दिला. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जनरल वॉर्डमधील एका खोलीत महिलेला दाखल करण्यात आले. काल रात्री खोलीत आई-बाबा, आजी आणि काकीही हजर होत्या. आई खोलीत बेडवर झोपली होती, तर वडील, आजी आणि काकी खाली जमिनीवर झोपले होते, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार बाळाला आजी आणि काकीने शेजारी जमिनीवर झोपवले.

दरम्यान, सर्वजण झोपलेले असताना रात्री सव्वा दोनच्या सुमारास नातेवाइकांचे डोळे उघडले असता त्यांचे बाळ तेथे नसल्याचे दिसून आले. शोध घेत असतानाच नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर धाव घेतली, तेथे बाळ कुत्र्याच्या तोंडात होते आणि कुत्रा मुलाला चावत होता. कुटुंबीयांनी सीसीटीव्ही तपासले असता, 2.07 वाजता कुत्रा बाळाला हॉस्पिटलमधून बाहेर नेताना दिसला. या संपूर्ण प्रकरणात रुग्णालयाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात असून, भटका कुत्रा खासगी रुग्णालयात कसा घुसला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago