Russia fired missiles at Ukraines mall, 16 people killed, more than 59 injured
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या चार महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. याच दरम्यान, रशियाने युक्रेनमधील गर्दी असणाऱ्या मॉलवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला, तर 59 जण जखमी झाले आहेत.
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन क्षेपणास्त्रांनी क्रेमेनचुक शहरातील एका शॉपिंग मॉलवर हल्ला केला. रशियाने KH-22 अँटी-शिप क्षेपणास्त्रांनी मॉलला लक्ष्य केले. हा हल्ला झाला तेव्हा मॉलमध्ये हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. युक्रेनच्या आपत्कालीन सेवा प्रमुखांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शॉपिंग सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. मॉलमध्ये 1 हजारहून अधिक नागरिक होते. मॉलला आग लागली आहे. बचाव पथक आग विझवण्यात व्यस्त आहे.
दुसरीकडे तेथे दारूगोळा बनवला जात असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, मॉस्कोने कीवमधील रॉकेट निर्मिती प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टमसाठी दारूगोळा तयार करण्यासाठी या प्लांटचा वापर केला जात होता.
या हल्ल्यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, युक्रेन मॉलवरील हल्ला पुतीनचा “क्रूरपणा आणि रानटीपणा” दर्शवतो. ज्या क्रेमेनचुक सिटी मॉलवर हल्ला झाला, ते 2 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. उद्योगांच्या दृष्टिकोनातून हे शहर अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…