देश

मोठी दुर्घटना! उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले!

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गोंडापासून ३० किलोमीटर दूर झिलाही रेल्वेस्टेशनच्या जवळ घडली आहे. प्रशासनाने बचाव पथकं गोंडाकडे रवाना केली आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या अपघातामुळे गोरखपूर ते लखनौ डाऊन दिशेच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात रेल्वेगाड्या रूळ रिकामा होण्याची वाट पाहत उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने झिलाहीच्या दिशेने धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. आरपीएफ व रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचंही एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. यासह वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं असून डब्यांमध्ये डकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचारांसाठी एक वैद्यकीय पथकही काही वेळात घटनास्थळी पोहोचेल अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

दरम्यान, या अपघातानंतर गोंडा-झिलाही मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर रेल्वेगाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात गाड्या उभ्या आहेत. दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचं एका प्रवाशाने सांगितलं. ही एक्सप्रेस चंदीगडहून डिब्रुगडला जात होती. गोंडा स्थानकातून बाहेर पडून २० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर झिलाही स्थानकाच्या आधी एक्सप्रेस रुळावरून घसरून हा अपघात झाला. रेल्वेचे आठ ते दहा डबे रुळावरून घसरल्याचं प्रवाशाने सांगितलं. या अपघातामुळे रेल्वेचे रूळही उखडले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago