महाराष्ट्र

दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं का? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

मुंबई : दीड हजार रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? लाडक्या भावांप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनाही दरमहा १० हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारकडे केली आहे.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मात्र आमची भूमिका आहे, की खरी गरज लाडक्या बहिणींना आहे, ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत, एअर इंडियाच्या कार्यालयासमोर २००० लोडरच्या जागा भरण्यासाठी २५ हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही १० हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यातही १० हजार रुपये टाका, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

१५०० रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर १५०० रुपयात चालू शकेल का? लाडक्या बहिणीवर अन्याय कशाला? लाडक्या बहिणीलाही १० हजार द्या आणि लाडक्या भावालाही. स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात दाखवून द्या, महाराष्ट्रावर ८ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकारने नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण ही मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊही आणलंय. पण १० हजारात बहिणींचं घर चालेल, शेतकरी आत्महत्या थांबतील, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८० जागा जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. आम्ही फक्त २८८ जागांची चाचपणी करतोय. मविआतील तिन्ही पक्ष तसाच अभ्यास करत आहेत. मग एकत्र बसून कोणी कुठे कशा जागा लढायच्या हे ठरवू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटातही काम केलंय. अनेकदा आपलं रंग रुप बदलून नाट्य निर्माण करण्यात ते माहीर आहेत. ते शरद पवारांच्या भेटीला का गेले, कसे गेले, त्यामुळे राजकारणात कशी खळबळ उडाली, हे सर्वांनी पाहिलं. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना महाराष्ट्रासह देशभरात प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात हा फिरता रंगमंच आहे. भुजबळ हे त्यावरील कलाकार, असं राऊत म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago