देश

न्यायाधीश उत्तम आनंद हत्या प्रकरण : लखन वर्मा आणि राहुल वर्मा दोषी, न्यायालय 6 ऑगस्टला सुनावणार शिक्षा

झारखंड : धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. लखन वर्मा आणि राहुल वर्मा हे दोन्ही आरोपी हत्येचा कट रचणे आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. दोन्ही आरोपींना कलम 302 आणि 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. पुढील तारखेला 6 ऑगस्ट रोजी सीबीआयचे विशेष न्यायालय दोन्ही दोषींना शिक्षा सुनावणार आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या गुन्हे शाखेचे विशेष सरकारी वकील अमित जिंदाल यांनी न्यायालयात सांगितले होते की, न्यायाधीशांची हत्या हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे.

शवविच्छेदन अहवालापासून ते फॉरेन्सिक अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, थ्रीडी प्रतिमा आणि व्हिडीओ फुटेज यावरून याची पुष्टी झाली आहे की दोषी लखन वर्मा आणि राहुल वर्मा यांनी मुद्दाम मोबाईल हिसकावण्यासाठी न्यायाधीशांना ऑटोने धडक दिली होती. ऑटोला धडकल्यानंतर न्यायाधीशांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांनीही न्यायालयासमोरील त्यांच्या जबानीत न्यायाधीशांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याची पुष्टी केली आहे.

न्यायाधीश उत्तम आनंद मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते
28 जुलै 2021, दिवस – बुधवार, वेळ – सकाळी 5 वाजता. न्यायाधीश उत्तम आनंद मॉर्निंग वॉक करून आपल्या घरी परतत होते. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. न्यायाधीश रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होते. त्याचवेळी मागून एक ऑटोरिक्षा आली. ऑटोरिक्षा रस्त्याच्या मधोमध सरळ पुढे जात होती, मात्र त्यानंतर अचानक रिक्षा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या दिशेने वळली आणि त्यांना जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago