देश

बापरे..! भक्ताने मंदिरात अर्पण करण्यासाठी कापली स्वतःची जीभ, रुग्णालयात उपचार सुरु

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शीतला मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पूरब शरारा गावातील रहिवासी असलेल्या एका भाविकाने आपली जीभ कापून ती मंदिरात अर्पण केली. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून उपस्थित लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. सध्या त्याची जीभ पूर्णपणे वेगळी झालेली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना उत्तर प्रदेशातील कडधाम कोतवाली परिसरातील शीतलधाम मंदिरात घडली. येथे शनिवारी संपत नावाच्या एका ४० वर्षीय व्यक्तीने स्वतःची जीभ कापली. संपत त्याची पत्नी भानमतीसह गंगेत स्नान करण्यासाठी आणि शीतला मातेच्या दर्शनासाठी कडधाम येथे पोहोचले होते. गंगेत स्नान केल्यानंतर संपत पत्नीसह मंदिरात दर्शन व पूजा करण्यासाठी गेले. यानंतर संपतने मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन ब्लेडने त्याची जीभ कापली आणि मंदिरात अर्पण केली. पतीच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून संपतची पत्नी रडू लागली. तिने सांगितले की तिला पती संपतच्या जीभ कापण्याचे कारण माहित नाही.

यादरम्यान घटनास्थळी उपस्थित लोकांनी रुग्णवाहिका बोलावून संपतला स्थानिक रुग्णालयात पाठवले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी संपतला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. संपत यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक केसरवाणी यांनी सांगितले की, त्यांची जीभ पूर्णपणे वेगळी झालेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

12 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago