देश

‘धोक्याची घंटा’ : जगाने पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही तर… ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला इशारा

जिनिव्हा : भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. भारतातील कोरोनाचा कहर ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा असून, जगाने आता पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही, तर याचे भारताबरोबरच जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा ‘युनिसेफ’च्या प्रमुखांनी दिला आहे.

भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे,’ असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाल्या. ही आपत्ती थांबविण्यासाठी तातडीची कारवाई आणि खंबीर नेतृत्व गरजेचे असल्याचे युनिसेफचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लॅरीए अड्जेयी यांनी निवेदनात म्हटले आहे. युनिसेफने भारताला २० लाख फेसशील्ड आणि दोन लाख सर्जिकल मास्कसह अतिरिक्त अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांचा पुरवठा केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण नोंदवले जात असून, तीन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. ‘युनिसेफ’च्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियामधील देशांत संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरी, एकट्या भारतात ९० टक्के बाधा आणि मृत्यू होत आहेत. जगातील ४६ टक्के कोरोनारुग्ण भारतात असून, एकूण कोरोना मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू भारतात होत असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago