देश

30 विद्यार्थ्यांना एकाच सिरिंजने दिली कोरोनाची लस, लसीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल, तपासाचे आदेश

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर येथील जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. लसीकरण करणार्‍यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जैन पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी शाळकरी मुलांसाठी कोरोना लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य विभागाने एका खासगी नर्सिंग कॉलेजच्या नर्सिंग विद्यार्थ्याची ड्युटी लावली होती. लसीकरण करणाऱ्या जितेंद्र या नर्सिंगच्या विद्यार्थ्याने एका सिरिंजने सुमारे ३० मुलांना कोरोनाची लस दिली. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना ही बाब कळाली आणि त्यांनी घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच पालक शाळेत पोहोचले आणि त्यांनी शाळेत एकच गोंधळ घातला.

असा झाला खुलासा
जैन पब्लिक स्कूलच्या एका विद्यार्थिनीने घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगितले की “तिच्या शाळेत लसीकरण शिबिर सुरू केले आहे. परंतु लसीकरण करणारा सर्वांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस देत आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि लसीकरणकर्त्याला विचारणा केली असता त्यांनी आपली चूक मान्य केली आणि त्यांना फक्त एकच सिरिंज दिल्याचे सांगितले.

तपासाचे आदेश
घटनेची माहिती मिळताच सागरचे जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. डीके गोस्वामी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह जैन पब्लिक हायस्कूलमध्ये पोहोचले आणि त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एकाच सिरिंजमधून 30 बालकांना लस दिल्याने त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, या प्रश्नावर ते म्हणाले की, लसीकरण झालेल्या सर्व बालकांची वारंवार आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर लसीकरण करणारा बेपत्ता गोपाळगंज पोलीस ठाण्यात लसीकरण करणारा जितेंद्र अहिरवार याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. येथे प्रकरण तापल्यानंतर लसीकरण करणारा फरार झाला आहे. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago