new covid19 variant found in south africa
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३३ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले आहेत. ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले की, कोविड-19 ची तिसरी लाट देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पष्टपणे पोहोचल्याचे दिसून येते. Omicron कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता या महानगरांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. महानगरांमधील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी ७५ टक्के प्रकरणे ओमिक्रॉनमधून येत आहेत. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की कोविड -19 ची तिसरी लाट देशात स्पष्टपणे आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांतील आकडेवारी या दिशेने निर्देश करते.
अरोरा यांनी म्हटले कि, “गेल्या 2-3 आठवड्यांच्या निरीक्षणावरून स्पष्टपणे दिसून येते की अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जीनोमिक सिक्वेन्सिंग देखील दर्शवित आहे की ओमिक्रॉनचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परंतु, घाबरण्याची गरज नाही; आरोग्य यंत्रणा कोणत्याही प्रकारची वाढलेली प्रकरणे हाताळण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कोविड वॉर्डातील ९० ते ९५ टक्के बेड्स आजही रिकामे आहेत. सध्या जे रुग्ण दाखल होत आहेत त्यातील बहुतेक सहव्याधीग्रस्त आहेत. रुग्णालयात न जाताही रुग्ण बरे होत आहेत.”
पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांनंतर दिल्लीतही आज मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाढीचा वेग पाहता देशातील अन्य राज्येही अशी पावले उचलतील अशी शक्यता आहे. कोविड टास्क फोर्स प्रमुख एन. के. अरोरा यांनी सांगितले कि, अत्यंत सुनियोजित पद्धतीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच ‘स्मार्ट कंटेनमेंट ‘ केल्यास स्थिती नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होईल. जिल्हा स्तरावर काही प्रमाणात निर्बंध लावता येतील, असंदेखील ते म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…