देश

ब्रेकिंग! यमुनोत्री महामार्गावर भीषण अपघात, बस दरीत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

उत्तराखंड : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस सुमारे २०० ते २५० मीटर खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दामट्यापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या नौगावच्या दिशेने झाला. बसमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 28 ते 29 जण होते. या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळल्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. यावर मी मुख्यमंत्री पुष्कर धामीजी यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago