bridge river kanchi collapsed
झारखंड : रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला अडकले आहेत. तीन वर्षांपूर्वीच ग्रामविकास विभागाकडून 13 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामाच्या वेळी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. पुलाचे खांब उभे करताना कोणतीही दाखल न घेता ते खांब दलदलीत उभे केले होते, ज्यामुळे पुलाचा पाया कमजोर होता. त्यातच हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच पूल कोसळण्याचे कारण नदीतून दररोज होणारे वाळूचे अवैध उत्खनन देखील असल्याचे सांगितले जात आहे. वाळू तस्कर पुलाच्या भोवती जेसीबी लावून वाळू उत्खनन करत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी पूल कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पाहणी केली. ते म्हणाले कि, “यापूर्वी देखील असाच एक उच्चस्तरीय पूल कोसळला असून दोन्ही पुलांचे बांधकाम करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई करायला हवी. अवैध वाळू उत्खननामुळे यापूर्वी देखील दोन पूल कोसळले आहेत. आता हा तिसरा पूल कोसळला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…