देश

जुन्या कार-बाईकधारकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम

पुणे : 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी महाग होणार आहे. दशकाहून जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता 600 रुपयांऐवजी 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनांसाठी ग्राहकाला आता 300 रुपयांऐवजी 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे, आयात केलेल्या कारसाठी, 15,000 रुपयांऐवजी  40,000 रुपये खर्च येईल.

विलंब केल्यास दंड आकारला जाईल
याव्यतिरिक्त, खाजगी वाहनांची पुनर्नोंदणी करण्यास विलंब केल्यास दरमहा 3000 रुपये दंड आकारला जाईल. व्यावसायिक वाहनांसाठी, हा दंड दरमहा 500 रुपये असेल. नवीन नियमांनुसार 15 वर्षांपेक्षा जुन्या प्रत्येक खासगी वाहनाला दर पाच वर्षांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागणार आहे. मात्र, या नियमातून राष्ट्रीय राजधानी दिल्लीला सूट देण्यात आली आहे. वास्तविक, दिल्लीत 15 वर्षांनंतर पेट्रोल वाहने आणि 10 वर्षांनंतर डिझेल वाहने अवैध मानली जातात.

व्यावसायिक वाहनांसाठी हा नियम
याशिवाय जुनी वाहतूक आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीचा खर्चही एप्रिलपासून वाढणार आहे. परिवहन मंत्रालयाच्या सुधारित दरांनुसार, 1 एप्रिलपासून टॅक्सीसाठी फिटनेस चाचणीसाठी 1,000 रुपयांऐवजी 7,000 रुपये लागणार आहेत. तर बस आणि ट्रकसाठी 1500 रुपयांऐवजी 12,500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर 8 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असेल.

वाहनधारकांना त्यांची जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडता यावा यासाठी केंद्र सरकारने नोंदणी नूतनीकरण शुल्कात वाढ केली आहे. अहवालानुसार, भारतात 1 कोटीहून अधिक वाहने स्क्रॅपिंगसाठी पात्र आहेत. जुनी वाहने स्क्रॅप करणे सोपे व्हावे यासाठी सरकारने ही प्रक्रिया ऑनलाइनही केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago