महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 30-40 जखमी

सोलापूर : सोलापूर येथे रविवारी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्याच्या कदमवाडी येथील रहिवासी असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. यात 6 जण गंभीर जखमी झाले असून, 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहानग्याचा समावेश आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात घडला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी आणि मृतांना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवण्यात आले. कदमवाडी येथील हे 30 ते 40 वारकरी सोमवारी एकादशी असल्याने त्यानिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. मात्र त्यादरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला.

अद्याप या अपघातातील मृतांची नावे समजली नाहीत. तसेच जखमींमध्ये समावेश असलेल्या एका किशोरवयीन मुलासह चार महिलांचीही नावे समजली नाहीत. राम शिंदे (वय ३०), मच्छिंद्र गोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंखे (वय ५०), जयश्री साळुंखे (वय ५०), नागनाथ साळुंखे (वय ४०), समर्थ साळुंखे (वय १६), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय १५), समर्थ अंगद मिसाळ (वय ६) अशी ओळख पटलेल्या अन्य जखमींची नावे आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago