देश

आज देशभरातील व्यापाऱ्यांची भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर होणार परिणाम जाणून घ्या..

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील उणीवांचा विरोधात आज (26 फेब्रुवारी) देशभरातील व्यापाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली. सुमारे 8 कोटी छोटे व्यावसायिक भारत बंदमध्ये सामील होतील. तसेच देशातील जवळपास 1 कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग तसेच महिला उद्योजकही यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील. रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने कॅटच्या समर्थनार्थ सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत चक्का जाम जाहीर केला आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण बंद राहील. निषेध म्हणून सर्व परिवहन कंपन्यांना उद्या आपली वाहने पार्क करण्यास सांगितले आहे. देशभरातील विविध राज्यात विरोध म्हणून 1500 ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.

कोणत्या संघटनांचा संपात असेल सहभाग :

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन व्यतिरिक्त राष्ट्रीय व्यापार संघटनांनीही मोठ्या संख्येने व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला आहे. विशेषत: ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनिअम भांडी उत्पादन व व्यापारी संघटना, उत्तर भारत मसाले व्यापारी संघटना, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इ. संघटनांनीही व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

काय -काय असेल बंद ?

  1. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे की 26 फेब्रुवारी रोजी देशातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील.
  2. 1 कोटी वाहतुकांनी 26 फेब्रुवारी रोजी संपची घोषणा केली आहे.
  3. चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनने देखील त्यांच्या ग्राहकांना शुक्रवारी कार्यालयात न येण्यास सांगितले आहे, त्यांची कार्यालये देखील बंद ठेवली जातील.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago