महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांना श्रद्धांजली..

मुंबई :  मराठी पत्रकारितेत संपादक म्हणून प्रयोगशील राहिलेले आणि होतकरूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक म्हणून सदा डुंबरे स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, माध्यमांच्या क्षेत्रातील बदलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डुंबरे यांनी संपादक म्हणून प्रयोगशीलता जपली. त्यांनी अनेकांना लिहिते केले. लेखन आणि विषयांत नाविन्य धुंडाळण्याचा प्रवाह डुंबरे यांनी निर्माण केला. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. प्रयोगशील संपादक म्हणून त्यांचे पत्रकारितेतील योगदान सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे (वय ७२) यांचे करोनाने गुरुवारी निधन झाले. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागातून पत्रकारितेतील पदवी घेतली. इंग्लंडच्या ‘थॉम्प्सन फाऊंडेशन’चा प्रगत पत्रकारितेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता. ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहात बातमीदार ते संपादक अशा विविध पदांवर काम करणारे डुंबरे ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक म्हणून सेवानिवृत्त झाले. राजकीय आणि सामाजिक घडामोडींबरोबरच विकास आणि पर्यावरण, भाषा आणि साहित्य या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते.

महाराष्ट्रातील प्रागतिक विचारांच्या संस्था चळवळी आणि गट यांच्याशी डुंबरे यांचे घनिष्ठ नाते होते. ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाचे संचालन करणाऱ्या ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘परिसर’ या संस्थांचे ते विश्वस्त होते. ‘आरसपानी’, ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘कर के देखो’ आणि ‘देणारं झाड’ या पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डुंबरे यांनी अनिल अवचट यांच्यावरील ‘वेध अवलियाचा’ या पुस्तकाचे संपादन केले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

3 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

6 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

6 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

7 दिवस ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

7 दिवस ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

7 दिवस ago