bees attacked on people who came for funeral in chandrapur 15 injured
चंद्रपूर : गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सरण रचण्यात आले त्याचवेळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यात पंधराजण जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना वरोरा तालुक्यात येणाऱ्या चिंचाळा गावात घडली.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचाळा या गावातील विजय चांदनबटवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता चिंचाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरु होते. स्मशानभूमी परिसरात मधमाशांचे पोळं होतं. या पोळ्यातील मधमाशांनी अचानक अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर हल्ला चढविला.
या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. मधमाशांच्या या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले आहेत. जखामितील नीतेश वाटोरे, ईश्वर बनसोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तुळशीराम आगलावे, सुरेश टेकाम, विरेंद्र चंदेल, अशोक भावराव चांदनबटवे, धनराज सुखदेव चांदनबटवे, गणेश देवराव नक्षिने, ईश्वर पावडे, नामदेव संभा दडमल, गणपत दडमल, शालिक वडार हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…