महाराष्ट्र

स्वर्गीय आमदार सौ मुक्ता शैलेश टिळक यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर

पुणे : स्वर्गिय आमदार सौ.मुक्ता शैलेश टिळक यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिरांचे आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी रमणबाग प्रशाला (फरशी चे मैदान) येथे ओम ब्लड बँक याच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, शिबीरात ४५० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

सदर रक्तदान शिबिरास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितत उद्घाटन झाले. सर्व रक्तदात्यांना आणि नियोजनातील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या कोरोना काळा नंतर रक्ताची गरज आरोग्य विभागाला किती आहे ह्याची जाणीव करून दिली. मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर आण्णा मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे,शहर सरचिटणीस राजेश येनपुरे युवामोर्चा शहराध्यक्ष बापु मानकर,अनिल बेलकर कसबा मदार संघ वैद्यकीय आघाडी प्रमुख तसेच कसबा मतदार संघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवर उपस्थित होते. दादांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून रक्तदान शिबीराची सुरूवात झाली रक्तदान करणाऱ्यांना दादांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला,दादांनी मनोगत व्यक्त केले.स्व.आमदार सौ मुक्ता शैलेश टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिबिराचे आयोजन शैलेश सर टिळक, कुणाल टिळक यांनी केले सूत्रसंचालन कसबा मतदारसंघ भाजप अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले,शिबीर व्यवस्थापन सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, राणीताई कांबळे युवा मोर्चा कसबा मतदारसंघ अध्यक्ष अमित कंक, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी पांडे व सर्व प्रभाग अध्यक्ष, पदाधिकारी यांनी केले शिबीरात टिळक परिवारातील सर्वच सदस्य उपस्थित होते , तसेच पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी च्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन मतदारसंघा तर्फे करण्यात आले .

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago