महाराष्ट्र

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या डिजिटल विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ गिते

मुंबई (प्रतिनिधी) : देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत काम करीत आहेत. गायकवाड आता ‘ई-चावडी’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. ‘डिजिटल मीडिया’च्या राज्य टीममध्ये ‘डिजिटल मीडिया’त काम करणाऱ्या दिग्गज पत्रकारांना घेण्यात आले आहे. ज्यात कार्याध्यक्ष योगेश कुटे संपादक लेट्सअप, मनोज साखरे दिव्य मराठी, उपाध्यक्षपदी महेश गलांडे लोकमत, डॉ. सोमनाथ गिते सकाळ, संतोष धायबर संपादक – पोलीसकाका महाभारत पोर्टल, सरचिटणीसपदी के. अभिजित एनजीओ खबर, नीलिमा राऊत डिजिटल जर्नलिस्ट, अशोक गव्हाणे सकाळ, सहसरचिटणीस प्रवीण खुंटे एएसपी मीडिया, मीनल गांगुर्डे न्यूज १८ लोकमत, प्रवक्तापदी प्रथमेश पाटील इंडी जर्नल, संघटकपदी अरुंधती गडाळे कूकपॅड ऍप, कार्यवाहकपदी भागवत पेटकर डेलीहंट, तुषार भामरे जळगाव लाईव्ह, संघटकपदी योगेश गायकवाड सलाम पुणे, अमित उजागरे ई-सकाळ, अक्षय कांबेकर पब्लिक वाईब न्यूज अॅप, प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर ससाणे ललकारी, सदस्यपदी अभिजित कांबळे संपादक महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, सोनल महाडिक लोकमत, तेजस शेलार अहमदनगर लाईव्ह, अविनाश पथक संपादक पंचनामा, महेश घोलप टीव्ही ९, सूरज पाटील मुंबई तक, मनीष भंडारी वेटून्यूज, गौतम संचेती दर्पण लाईव्ह, अश्विनी नागरे संपादक, थोडक्यात घडामोडी यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देत राजा माने म्हणाले, काळाप्रमाणे पत्रकारिता बदलली आहे, डिजिटल मीडियाच्या बाबतीत होत चाललेला बदल सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्यभरात पुढाकार घेईल.

संदीप काळे म्हणाले, अजूनही ‘डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. ‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी आमची लढाई असेल. यासाठी पॉलिसी बनवून ती पॉलिसी राज्य, केंद्राकडून अमलात आणली जाणार आहे.

राज्यभरातील न्यूज पोर्टल, न्यूज यू-ट्युब चॅनेलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही काम करीत राहू. येत्या दहा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व विभाग, जिल्हा, तालुक्याचे, अध्यक्ष, सर्व कार्यकारिणी घोषित केली जाणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago