bank fraud register cyber fraud complain help line number home ministry
नवी दिल्ली : डिजिटल आणि ऑनलाईन बँकिंग गेल्या काही वर्षात खूप प्रचलित झाली आहे. परंतु या सेवांच्या विस्तारासह, डिजिटल फसवणुकीची प्रकरणेही अनेकदा समोर येतात. डिजिटल सेवांमुळे आपल्याला मिळणाऱ्या सुविधाही वाढल्या आहेत. परंतु अनेक वेळा असे होते की या सेवा वापरताना आपण ऑनलाइन आणि डिजिटल फसवणुकीचे बळी ठरतो.
अनेकदा डिजिटल फसवणुकीच्या घटना समोर येत राहतात. परंतु माहिती नसल्यामुळे आणि वेळेअभावी बऱ्याचदा डिजिटल फसवणुकीची तक्रार दाखल केली जात नाही. डिजिटल फसवणुकीच्या या वाढत्या घटना थांबवण्यासाठी आणि या समस्यांवर मात करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही डिजिटल फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता.
जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाने 155260 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. हेल्पलाईन क्रमांकाची ही सेवा मंत्रालयाकडून दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि आसामसारख्या राज्यांमध्ये २४ तास उपलब्ध आहे. इतर राज्यांमध्ये ही सेवा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान उपलब्ध आहे.
हेल्पलाईन नंबर व्यतिरिक्त, ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारींसाठी तुम्ही गृह मंत्रालय पोर्टल https://cybercrime.gov.in/ ला भेट देऊ शकता. हेल्पलाईन क्रमांकासह, इतर अनेक सेवा देखील तुम्हाला या पोर्टलद्वारे दिल्या जात आहेत.
तक्रार कशी करावी?
तुमची फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर 155260 वर कॉल करू शकता, तिथे कॉलवर तुम्हाला घटनेशी संबंधित काही मूलभूत माहिती विचारली जाईल. याशिवाय, तुम्ही https://cybercrime.gov.in/ ला देखील भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला तुमच्या संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही मिळेल. जर तुमच्याबरोबर अशाप्रकारे फसवणुकीची कोणतीही घटना घडली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमची तक्रार नोंदवायला हवी.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…