देश

बाबा रामदेव यांना ऍलोपॅथीच्या विरोधात बोलणं पडलं महागात, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : ऍलोपॅथीच्या विरोधात भाषणबाजीच्या बाबतीत पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवून समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने विचारले आहे की, याची काय हमी आहे की रामदेव सर्व आजार बरे करतील? यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांना ऍलोपॅथीच्या विरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका, असा सल्ला दिला होता.

मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. ऍलोपॅथीची बदनामी करणाऱ्या जाहिराती दाखवल्याबद्दल कोर्टाने स्पष्टीकरण मागितले आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘रामदेव आपली यंत्रणा लोकप्रिय करू शकतात, पण इतरांवर टीका का करावी? त्यांनी योगाला लोकप्रिय बनवावे, पण इतर व्यवस्थेबाबत चुकीचे बोलणे त्यांनी टाळावे. ते त्यांच्या व्यवस्थेची महानता सांगू शकतात. परंतु, त्यांनी सर्व डॉक्टर्स, ऍलोपॅथी, प्रत्येक औषध पद्धतीवर आरोप का करावेत? असा सवाल एनव्ही रमणा यांनी केला.

खंडपीठाने असा सवाल केला कि, रामदेव ज्या गोष्टींचे पालन करतात त्या सर्व रोग बरे करतील याची काय हमी आहे, या खटल्याच्या सुनावणीत सहभागी असलेले दुसरे न्यायमूर्ती सीटी रविकुमार म्हणाले की, जणू ऍलोपॅथीची थट्टा केली जात आहे.

कोरोनाच्या काळात बाबा रामदेव यांनी कोरोनिल नावाचे औषध लॉन्च केले होते आणि दावा केला होता की त्याच्या सेवनाने कोरोनाबाधित रुग्ण बरा होतो. यासोबतच त्यांनी कोरोनिलची विक्री वाढवण्यासाठी अ‍ॅलोपॅथिक औषध पद्धती आणि आरोग्य संस्थांकडून प्रमाणित केलेल्या लसीवर टीका केली होती. त्यांनी लसीबाबत लोकांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला होता.

रामदेव म्हणाले होते की, लस मिळाल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना झाला, हे वैद्यकीय शास्त्राचे अपयश आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयानेही बाबा रामदेव यांना फटकारले होते. त्यांनी ऍलोपॅथीच्या विरोधात वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago