monkeypox
केरळ : केरळमध्ये मंगळवारी मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळून आला. हा केरळमधील पाचवा आणि भारतातील सातवा मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला रुग्ण आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 30 वर्षीय रुग्ण यूएईहून 27 जुलै रोजी कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. त्याच्यावर सध्या मलप्पुरममध्ये उपचार सुरू आहेत.
दिल्लीत काल एका 35 वर्षीय नायजेरियन व्यक्तीची मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भारतातील सातवी घटना समोर आली आहे. तो मंकीपॉक्सचा दिल्लीतील दुसरा व्यक्ती आहे. एक वर्षापासून दिल्लीत वास्तव्यास असलेल्या या व्यक्तीचा परदेशी किंवा स्थानिक प्रवासाचा कोणताही अलीकडील इतिहास नाही.
मंकीपॉक्समुळे देशातील पहिला मृत्यू नुकताच केरळमध्ये झाला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकताच यूएईहून परत आलेल्या एका २२ वर्षीय पुरुषाचा शनिवारी या आजारामुळे मृत्यू झाला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…