A third contingent of three Raphael aircraft arrived in India
फ्रान्स येथून तीन राफेल विमाने रात्री उशिरा भारतात दाखल झाली. सात हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे उड्डाण न थांबता पार करून ही तीन राफेल विमाने थेट भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर लॅन्ड झाले. या विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे.
तिन्ही राफेल विमानांमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया हवेतच संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (एमआरटीटी) ने केली. हवाई दलाने सांगितले की नवीन राफेल विमाने आल्यानंतर आता या विमानांची संख्या 11 झाली आहे.
भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, “तीन राफेल विमाने काही काळापूर्वी भारतीय हवाई दलाच्या तळावर दाखल झाले. या विमानांनी सात हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे उड्डाण हवेत इंधन भरण्याच्या प्रक्रियेसह पार केले. युएईच्या हवाई दलाने दिलेल्या टँकर सपोर्टची भारतीय हवाई दल दाद देते.’
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…