87 Years Old Woman Seeks Help To Get Ridden Of Her Hypersexual 89 Years Old Husband
गुजरात : गुजरातच्या 181 अभयम हेल्पलाइनमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सगळेच थक्क झाले. या हेल्पलाइन क्रमांकावर महिलांच्या समस्यांचे निराकरण होते. यावर एका 87 वर्षीय वृद्ध आणि आजारी महिलेने फोन केला आणि वारंवार शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या आपल्या 89 वर्षांच्या पतीपासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. वृद्ध पती पत्नीकडे संबंध ठेवण्यासाठी वारंवार मागणी करतो, मात्र आजारी पत्नी त्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्याचा आरोप आहे.
अभयम हेल्पलाइनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “दोघांचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत, परंतु एक वर्षापूर्वी ही वृद्ध महिला आजारी पडली होती आणि तिला अंथरुणातून उठता येत नव्हते. ती मुलगा आणि सून यांच्या मदतीने क्वचितच हालचाल करू शकते. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पतीला आपल्या पत्नीची स्थिती चांगलीच ठाऊक आहे, तरीही तो तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.
छळाला कंटाळून घेतली अभयमची मदत
दरम्यान, या प्रकरणात वृद्ध पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यावर सेवानिवृत्त अभियंता पती पत्नी आणि मुलाशी भांडण करायचा आणि आरडाओरडा करायचा, त्यामुळे शेजाऱ्यांनाही ही बाब समजायची. अखेर वडिलांच्या या सर्व छळाला कंटाळून कुटुंबीयांनी अभयमची मदत घेतली.
अभयमने केले समुपदेशन
अभयमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला दोन दिवसांपूर्वी एक फोन आला, त्यानंतर आम्ही लगेच त्याच्या घरी पोहोचलो आणि त्या व्यक्तीला भेटलो. आम्ही त्याला सांगितले की, तुझी प्रतिमा मलीन होत आहे आणि तुझी पत्नीही नाराज आहे. अभयम टीमने आरोपी पतीचे समुपदेशन केले आणि त्याचे लक्ष इतर गोष्टींकडे वळवून योगा आणि वरिष्ठ क्लबमध्ये सामील होण्यास सांगितले. अभयमच्या अधिकार्यांनी कुटुंबातील सदस्यांना अधिक समुपदेशन सत्रे आयोजित करून त्यांना लैंगिक तज्ज्ञांकडे नेण्याची सूचना केली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…