देश

राम मंदिरासाठी २८ वर्षांपासून उपवास

रामललाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिर उभे राहावे, त्यासाठी राम भक्तांनी शेकडो वर्ष संघर्ष केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहावे, यासाठी पडद्यामागे अनेकांनी हातभार लावला आहे. समाजात अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांनी पडद्यामागे राहून राम मंदिराच्या निर्माणासाठी साधना केली आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. राम मंदिरासाठी उर्मिला यांनी गेल्या २८ वर्षांपासून उपवास ठेवला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी उर्मिला यांनी राम मंदिराचे निर्माण होत नाही, तो पर्यंत अन्नगहण करणार नाही असा संकल्प केला. उर्मिला चतुर्वेदी यांचे वय तेव्हा ५४ वर्ष होते. न्यूज १८ हिंदीने हे वृत्त दिले आहे.

२८ वर्षात उर्मिला यांनी राम नामाचा जप करताना अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. फक्त त्या फळांचे सेवन करुन साधनेमध्ये व्यस्त असतात. उद्या पाच ऑगस्टला २८ वर्षानंतर भूमिपूजनाने त्यांचा संकल्प सिद्धीस जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून उर्मिला प्रचंड आनंदात आहेत. अयोध्येत रामललाच्या दर्शनानंतर शरयू नदीच्या किनाऱ्यावर २८ वर्षांपासून सुरु असलेला उपवास आपण सोडणार आहोत, असे उर्मिला चतुर्वेदी यांनी सांगितले.

उद्या जेव्हा अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन होईल, त्यावेळी उर्मिला दिवसभर आपल्याघरी राम नापाचा जप करतील. उर्मिला यांची अयोध्येमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. पण करोना संक्रमणाचा धोका आणि डॉक्टरच्या परवानगीनंतरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. उर्मिला व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण आज आनंदात आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago