मनोरंजन

सुशांतच्या खात्यातून ५३ कोटी काढले गेले, यावर मुंबई पोलिसांचं मौन- बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे.

“गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५५ कोटी रुपये जमा केले गेले आणि आश्चर्यकारकरित्या ५३ कोटी खात्यातून काढले गेले. एका वर्षात १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. विशेष म्हणजे त्याने घर घेतलं नाही, गुंतवणूक केली नाही, मग इतके पैसे कुठे गेले, हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार”, असं बिहारचे पोलीस महासंचालक म्हणाले.पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आलं. याविषयी ते म्हणाले, “सुशांत प्रकरणात मिळवलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल विनय तिवारी यांच्याकडे सोपवण्याऐवजी त्यांनी अधिकाऱ्याला क्वारंटाइन केलंय. मी कोणत्याही राज्याच्या पोलिसांकडून अशाप्रकारची वागणूक पाहिली नाही. जर मुंबई पोलिसांचा प्रामाणिक दृष्टीकोन असेल तर त्यांनी आम्हाला तपासाची परवानगी द्यायला हवी आणि सहकार्य करायला हवं,” असंही बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago